इक्ष्वाकु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इक्ष्वाकु (देवनागरी लेखनभेद: इक्ष्वाकू ; संस्कृत: इक्ष्वाकु ;) हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथ, दशरथ, राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.

परिवार[संपादन]

पद्म पुराणानुसार इक्ष्वाकूला सुदेवा नामक पत्नी होती[१]. भागवत, देवी भागवत, महाभारत इत्यादी ग्रंथांनुसार यास विकुक्षी, दण्डक, दशाश्व इत्यादी शंभर पुत्र होते. इक्ष्वाकूनंतर विकुक्षी अयोध्येचा राजा झाला; दण्डक हा दंडकारण्याचा राजा बनला, तर दशाश्वाने माहिष्मतीवर राज्य केले[१].

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ सिद्धेश्वरशास्त्री चित्राव (इ.स. १९६८). भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे, पृ. ११३-११४. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.