गॅब्रियेल गार्सिया मार्केझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॅब्रियेल गार्सिया मार्केझ (६ मार्च, इ.स. १९२७ - ) हे नोबेल पारितोषिक विजेते कोलंबियन साहित्यिक आहेत. २० व्या शतकातील एक महत्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. दक्षिण अमेरिकेत गॅबो या नावाने लोकप्रिय असणारे मार्केझ यांना १९८२ मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.