खलनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खलनायक हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, चित्रपट इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते.

भारतीय हिंदी सिनेमांमध्ये प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, शाहरूख खान यांनीही खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.