क्वेचुआ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा. ही इन्का साम्राज्याची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वाडोर व पेरु या देशांत ही बोलली जाते.
या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्म व क्रियापद अशी असते. तसेच अनेक संधी व समास असतात.
बोलिव्हिया, इक्वाडोर व पेरु यांची ही कार्यालयिन भाषा आहे.