कॉलोराडो नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कॉलोराडो | |
| अन्य नावे | रियो कॉलोराडो |
| उगम | ला पूडर पास सरोवर २,७०० मी. |
| मुख | कॅलिफोर्नियाचा अखात |
| लांबी | २,३३० कि.मी. |
| देश | कॉलोराडो, युटा, अॅरिझोना, नेव्हाडा, कॅलिफोर्निया (अमेरिका) |
| उपनद्या | ग्रीन नदी, लिटल कॉलोराडो नदी, गिला नदी |
| सरासरी प्रवाह | ६२० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | ६,२९,१०० किमी² |
| धरण | हूवर धरण, ग्लेन कॅन्यन धरण |
हा लेख कॉलोराडो नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कॉलोराडो.
कॉलोराडो नदी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे. रॉकी पर्वतरांगेतपासून वाहणारी ही नदी युटा, नेव्हाडा, अॅरिझोना व कॅलिफोर्नियातून वाहत कॉर्तेझच्या समुद्रास मिळते. ग्रँड कॅन्यन ही या नदीने लक्षावधी वर्षांत कोरून काढलेली अतिप्रचंड घळ आहे. या घळीचा समावेश जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांमध्ये करण्यात आलेला आहे.
या नदीवर हूवर डॅम हा बांध आहे.