केट ब्लॅंचेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केट ब्लँचेट
जन्म Catherine Élise Blanchett
१४ मे, १९६९ (1969-05-14) (वय: ४५)
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलिया
कार्यक्षेत्र हॉलीवूड अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू

केट ब्लँचेट (इंग्लिश: Cate Blanchett; जन्म: १४ मे १९६९) ही एक ऑस्ट्रेलियन सिने अभिनेत्री आहे. १९९२ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी ब्लँचेट १९९८ सालच्या शेखर कपूर दिग्दर्शित एलिझाबेथ ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला बाफ्टागोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. २००४ सालच्या द एव्हियेटर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. २००१-४ दरम्यान तिने द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ह्या चित्रपट शृंखलेमध्ये गॅलाड्रियेल ह्या पात्राची भूमिका केली होती.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ब्ल्यू जॅस्मिन नावाच्या चित्रपटामधील भूमिकेसाठी ब्लँचेटला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: