कल्याणसुंदर मूर्ती
Appearance
शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे अंकन ज्या मूर्तीमध्ये केलेळे असते तिला कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. यामध्ये ब्रह्मा या विवाहाचा पुरोहित म्हणून दाखविलेला असतो. आनंदाने नाचणारे शिवगणही या शिल्पात दिसून येतात. वेरूळ येथील लेण्यात विष्णू -लक्ष्मी कन्यादान करण्यास उभे आहेत असेही अंकन दिसते.[१]अशा प्रकारच्या मूर्ती भारतात आढळतात. घारापुरी येथील लेण्यात अशा मूर्तीचे शिल्प आढळून येते.शंकराने मदनाचे दहन करून त्यानंतर पार्वतीशी विवाह केला अशी कथा यामागे आहे.
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड २