ऍमेझॉन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऍमेझॉन नदीचे मुख

ऍमेझॉन ही जगातील सर्वात मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) नदी आहे. ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ऍन्देस पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरपाशी आहे. ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ती दक्षिण अमेरिका खंडातील पेरू, कोलंबिया, ब्राझिल, बॉलिव्हिया, व्हेनेझुएला, इक्वेडोरगयाना ह्या ७ देशांतून वाहते. ह्या नदीचे पात्र पावसाळी ऋतूंमध्ये अंदाजे १९० - २१० किमी इतके रुंद असते. ऍमेझॉनच्या ह्या अतिविशाल आकारामुळे आजपर्यंत ह्या नदीवर एकही पुल बांधण्यात आलेला नाही.