Jump to content

स्फटिकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्फटिकशास्त्र हे स्फटिकांच्या रचना अभ्यासाचे शास्त्र आहे. स्फटिकशास्त्र घन पदार्थांमध्ये मध्ये अणू व्यवस्थेचा अभ्यास आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करून क्ष-किरणांच्या साह्याने एखाद्या रेणूच्या स्फटिकाची संरचना अभ्यासता येते. या पूर्वी हे स्फटिकांच्या बाजूकोन मोजण्यासाठी, आणि स्फटिकांच्या सममिती कशा स्थापन झाल्या आहेत याचा अभ्यासही हे शास्त्र करत असे. नवीन तंत्रात किरणांचा मारा करून स्फटिक रचना नमुन्यांचे विश्लेषण करून अभ्यास केला जातो. हे तंत्र लॉरेंस ब्रॅग व विल्यम ब्रॅग यांनी शोधले यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. निरिक्षणासाठी क्ष किरण वापरात असले तरी काही वेळा न्युट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचाही वापर केला जातो. या तिन्हीचा वापर करून निरनिराळ्या प्रकारे स्फटिकांचा अभ्यास केला जातो

अभ्यास पद्धती

[संपादन]

स्फटिक मिळवल्यावर किरणांचा वापर करून त्या विषयी विदा जमा केला जातो. किरणांचे विवर्तन कसे आहे यानुसार अभ्यासाची दिशा ठरते. यावरून प्रतिमा बनवण्यासाठी प्रगत गणिताचा वापर केला जातो. या शिवाय तंतू आणि चूर्ण यांचा अभ्यास करूनही निष्कर्ष मांडले जातात.