विदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संगणकावरील माहितीला विदा (इंग्रजी: Data - डेटा किंवा डाटा) तर माहिती साठ्याला विदागार असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे म्हणून विद् या संस्कृत शब्दा वरून हा शब्द आला आहे. जसे विद् पासून विद्या.

विदा हा अनेक घटकांचा बनलेला असु शकतो.जसे प्रयोग, निरिक्षणे, आकडेवारी, चित्र इत्यादी. तसेच यात शब्द ही येऊ शकतात.

विदागार[संपादन]

असा साठवलेला विदा म्हणजेच विदागार (डेटाबेस)

शास्त्र व संगणकातील विदा[संपादन]

सर्वसाधारणपणे विदा म्हणजे माहितीचे संकलन. असंकलित माहिती मानवी अथवा संगणका द्वारे एकत्रीत करून त्यातून दुसऱ्या संगणका अथवा मानवाला समजेल अशा माहितीच्या निष्कर्षात रुपांतर करणे म्हणजेच विदा प्रक्रीया करणे.

साठवण[संपादन]

संगणकात माहिती साठविण्याची अनेक माध्यमे असतात जसे हार्ड डिस्क, फ्लॉपी, सी.डी., डी.व्ही.डी., यू.एस.बी., चुंबकीय फित इत्यादी.