सुधीर कुमार चौधरी (गौतम)
सुधीर कुमार चौधरी (गौतम) (जन्मः इ.स. १९८३ मुझफ्फरपूर, बिहार, भारत) (काही बातम्यांमध्ये गौतम ह्या नावाने देखील उल्लेख होतो.) हा एक भारतीय क्रिकेट संघाचा खूप मोठा चाहता आहे.[१] तो जवळपास भारताच्या (भारतात खेळल्या जाणाऱ्या) प्रत्येक सामन्यात व ज्या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळत असेल त्यात विशेषतः पहावयास मिळतो. त्याचे संपूर्ण शरीर भारतीय झेंड्याच्या तिरंग्या रंगात रंगविलेले असते, त्याच्या हातात भारताचा झेंडा असतो, तसेच अंगावर ठळक अक्षरात १० हा आकडा व तेंडुलकर असे रोमन लिपीत लिहीलेले असते. त्याच्या सांगण्यानुसार तो सचिन तेंडुलकर ह्यांचा सर्वात मोठा चाहता असून त्यास प्रत्येक सामन्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च सचिन कडून पुरविला जातो. तो सहसा सामन्यादरम्यान दूरदर्शन वर दाखविला जातो, सध्या (आयपीएल २०१०) तो सचिन तेंडुलकर खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या प्रत्येक सामन्यात पहावयास मिळतो.
हेसुद्धा पाहा
[संपादन]- सचिन तेंडुलकर
- मुंबई इंडियन्स
- सुधीर चौधरीचा जीवनप्रवास Archived 2020-03-17 at the Wayback Machine.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- Bajpai, Shalabh Anand; Sumit Jha (27 November 2009). "Cricket fever hits Kanpur". Times of India. Retrieved 15 February 2010.
- "Sachin fan pedals to Bangladesh". The Tribune. 15 May 2007. Retrieved 15 February 2010.
- "A fan who gifts Sachin 1,000 litchis every year". DNA. May 27, 2007. Retrieved 15 February 2010.
- "Police apologise to Sachin fan". That's Cricket. November 24, 2009. Retrieved 15 February 2010.
- "Briefly". The Tribune. 12 February 2006. Retrieved 15 February 2010.
- Ali, Qaiser Mohammad (13 November 2009). "Sachin: A player who is the game itself". India Today. Retrieved 18 February 2010.
- Nayudu, Vinay (28 October 2003). "Fans queue up outside Wankhede". Indian Express. Retrieved 15 February 2010.
- Binoy, George (4 June 2007). "A snake charmer and an investment guru". Cricinfo. Retrieved 15 February 2010.
- "Sachin is this fan's match ticket". Times of India. 31 January 2007. Retrieved 18 February 2010
- ^ Pathade, Mahesh. "निष्काम क्रिकेटयोगी!". Kheliyad. 2020-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-15 रोजी पाहिले.