सिंह (निःसंदिग्धीकरण)
Appearance
सिंह या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
वर्णन
[संपादन]१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्त्व १०००० वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्त्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत. पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.