Jump to content

साल्व्हादोर दाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साल्व्हादोर दाली
Salvador Dalí
जन्म मे ११, इ.स. १९०४
फिगेरेस, कातालोनिया, स्पेन
मृत्यू जानेवारी २३, इ.स. १९८९
फिगेरेस, स्पेन
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
पेशा चित्रकार

साल्व्हादोर दाली (स्पॅनिश: Salvador Domènec Felip Jacint Dalí i Domènech, Marquis de Púbol; मे ११, इ.स. १९०४ - जानेवारी २३, इ.स. १९८९) हा एक स्पॅनिश चित्रकार होता.

चित्रकृती

[संपादन]

साल्वादोर दालीने जवळपास १५०० चित्रकृतींची निर्मिती केली.[] इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड' हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स' या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर अतिप्रसंग करणाऱ्या पुरुषाची प्रतिमा रेखाटली आहे. `सिटी ऑफ ड्रॉअर्स' मध्ये स्त्रीच्या नग्न शरीरातून टेबलाचे खण बाहेर पडताना दाखवले आहेत. `द स्पेक्टर ऑफ सेक्स अपील' या चित्रकृतीकून त्याने बालकांच्या मनातील सुप्त कामप्रेरणांचा प्रतिकात्मक वेध घेतला. `वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्रॉम अ ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पॉमग्रेनेट' (इ.स. १९४४) या चित्रातून त्याने डाळिंबातून झेपावणारी क्रूर श्वापदे स्त्रीवर आक्रमण करताना रेखाटली आहेत.[] स्पेनमधील यादवी युद्धावर `प्रीमोनिशन ऑफ सिव्हिल वार' हे यादवीचे संहारक परिणाम सूचित करणारे चित्र साल्वादोरने इ.स. १९३६ साली काढले. फ्रॉइडच्या `नार्सिसिझम'वर आधारलेले `मेटॅमॉर्फोसिस ऑफ नार्सिसस' हे चित्रही त्याने रेखाटले. अवकाशाची असीमता आणि काळाची अनेकार्थी रुपे सूचित करणारे `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' हे चित्र त्याने इ.स. १९३१ साली रेखाटले. सध्या ते न्यू यॉर्क येथील `म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट' येथे ठेवलेले आहे.[] `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' आणि `ॲग्नॉस्टिक सिंबल' या दोन्ही चित्रात त्याने घड्याळाच्या प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केलेला आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "The Salvador Dalí Online Exhibit". MicroVision (इंग्रजी भाषेत). २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  2. ^ "Dream Caused by the Flight of a Bee Around a Pomegranate, A Second Before Awakening" (इंग्रजी भाषेत). Fulcrum Gallery. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  3. ^ "Salvador Dalí. The Persistence of Memory. 1931" (इंग्रजी भाषेत). म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट, न्यू यॉर्क. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: