साल्व्हादोर दाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
साल्व्हादोर दाली
Salvador Dalí
Salvador Dalí 1939.jpg
जन्म मे ११, इ.स. १९०४
फिगेरेस, कातालोनिया, स्पेन
मृत्यू जानेवारी २३, इ.स. १९८९
फिगेरेस, स्पेन
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
पेशा चित्रकार

साल्व्हादोर दाली (स्पॅनिश: Salvador Domènec Felip Jacint Dalí i Domènech, Marquis de Púbol; मे ११, इ.स. १९०४ - जानेवारी २३, इ.स. १९८९) हा एक स्पॅनिश चित्रकार होता.

चित्रकृती[संपादन]

साल्वादोर दालीने जवळपास १५०० चित्रकृतींची निर्मिती केली.[१] इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड' हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स' या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर अतिप्रसंग करणाऱ्या पुरुषाची प्रतिमा रेखाटली आहे. `सिटी ऑफ ड्रॉअर्स' मध्ये स्त्रीच्या नग्न शरीरातून टेबलाचे खण बाहेर पडताना दाखवले आहेत. `द स्पेक्टर ऑफ सेक्स अपील' या चित्रकृतीकून त्याने बालकांच्या मनातील सुप्त कामप्रेरणांचा प्रतिकात्मक वेध घेतला. `वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्रॉम अ ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पॉमग्रेनेट' (इ.स. १९४४) या चित्रातून त्याने डाळिंबातून झेपावणारी क्रूर श्वापदे स्त्रीवर आक्रमण करताना रेखाटली आहेत.[२] स्पेनमधील यादवी युद्धावर `प्रीमोनिशन ऑफ सिव्हिल वार' हे यादवीचे संहारक परिणाम सूचित करणारे चित्र साल्वादोरने इ.स. १९३६ साली काढले. फ्रॉइडच्या `नार्सिसिझम'वर आधारलेले `मेटॅमॉर्फोसिस ऑफ नार्सिसस' हे चित्रही त्याने रेखाटले. अवकाशाची असीमता आणि काळाची अनेकार्थी रुपे सूचित करणारे `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' हे चित्र त्याने इ.स. १९३१ साली रेखाटले. सध्या ते न्यू यॉर्क येथील `म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट' येथे ठेवलेले आहे.[३] `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' आणि `ॲग्नॉस्टिक सिंबल' या दोन्ही चित्रात त्याने घड्याळाच्या प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केलेला आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Salvador Dalí Online Exhibit". MicroVision (इंग्रजी भाषेत). २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  2. ^ "Dream Caused by the Flight of a Bee Around a Pomegranate, A Second Before Awakening" (इंग्रजी भाषेत). Fulcrum Gallery. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  3. ^ "Salvador Dalí. The Persistence of Memory. 1931" (इंग्रजी भाषेत). म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट, न्यू यॉर्क. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: