षटकार
Appearance
षटकार क्रिकेटच्या खेळातील फटका आहे. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने त्याच्या बॅटीने टोलवून जमिनीला स्पर्श न करता सीमापार केल्यास षटकार जाहीर करून फलंदाजास सहा धावा देण्यात येतात.
एका षटकात सहा षटकार मारणारे फलंदाज :
- वेस्ट इंडीज सर गारफील्ड सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये १९६८ साली नॉटिंगहॅमशायरसाठी काउंटी सामन्यात खेळताना.
- भारत रवी शास्त्री याने रणजी सामन्यात खेळताना.
- दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्जने एकदिवसीय विश्वकरंडकाच्या सामन्यात खेळताना.
- भारत युवराज सिंगने ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यात खेळताना.
- इंग्लंड लँकेशायरचा फलंदाज जॉर्डन क्लार्क याने इंग्लंडमध्ये स्कारबोरो येथे यॉर्कशायर संघाविरुद्ध खेळताना (२५ एप्रिल २०१३ रोजी).