"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.


ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.


{{बदल}}
{{बदल}}

११:४०, १६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

ट्विटर
ट्विटर
उपलब्ध भाषा बहुभाषिक
दुवा http://www.twitter.com/
अनावरण १५ जुलै २००६
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन

ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.

ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक २८० शब्दांची मर्यादा आहे.


उपयोग

ट्विटरचे वापरकर्ते वेगवेळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात. वेब ब्राउझरने संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यावत करता येते. त्याशिवाय ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब ॲप्लिकेशन्स) प्रयोगही करता येतात. जगभरात अनेक लोक एका तासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यावत करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेत, कारण अनेक लोकांना या अत्याधिक संयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीला) सतत आपल्याशी संबंधित ताज्या सूचना देणे कटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवेचे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.

ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिकाेध्ये २००८ च्या राष्ट्रपति निवडणुकांत दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्ते आम जनतेपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून पोहचले. हेइक्रोब्लॉगिंग विख्यात व्यक्तीनाही आकर्षित करत आहे. म्हणून ब्लॉग अड्डाने अमिताभ बच्चनच्या ब्लॉगनंतर त्यांच्या साठीची माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा सुरू केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे इच्छुक बराक ओबामा पण ट्विटरवर असतात.. शशी थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीही साईटवर दिसतात. पूर्वी ही सेवा इंग्रजीमध्येच उपलब्ध होती, नंतर ती अन्य भाषांतही उपलब्ध झाली आहे. ती स्पॅनिश, जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इटालियन भाषा आता येथे उपलब्ध आहेत.

रँकिंग्स :

ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.

ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षणकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगने ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.