"कोथिंबीर वडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:


[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]

१५:०१, २० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

कोथिंबीर वडीचे सारण
कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी हा कणकेच्या पारीत(वाटीत) कोथिंबिरीचे सारण भरून, वाफवून बनवला जाणारा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :-

१. एक वाटी बेसन
२. एक मध्यम आकाराची कोथिंबिरीची जुडी बारीक चिरून
३. एक कांदा उभा आडवा चिरून
४. एक चमचा लाल तिखट
५. एक चमचा धणे पूड
६. एक चमचा जिरे
७. अर्धा चमचा हळद
८. दोन चमचे तांदळाचे पीठ
९. दोन चमचे हिरवे वाटण (मिरची + कोथिंबीर + आले)
१०. दोन चमचे तेल
११. चवीनुसार मीठ.

फोडणी साठी

१. एक चमचा तेल
२. एक चमचा मोहरी
३. सजावटीसाठी किसलेला नारळ

कृती :-

सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्यावे.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.
एका ताटाला तेलाचे बोट लावून हे मिश्रण त्यात पसरवून ठेवावे.
शिट्टी न लावलेल्या प्रेशर कुकरमध्य इडलीप्रमाणे १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
गार झाल्यावर वड्या पाडून वरून मोहरीची फोडणी द्यावी.
नारळाच्या किसाने सजवून गरमागरम चहासोबत खायला द्यावे.

यालाच काही ठिकाणी सांबार वडी असेही म्हणतात.