"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 249 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q52
छो incorrect interwiki
ओळ ७४: ओळ ७४:


{{Link FA|ceb}}
{{Link FA|ceb}}

[[nv:Íiyisíí Naaltsoos]]

००:५२, २२ जून २०१३ ची आवृत्ती

विकिपीडिया
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर
स्थापना जानेवारी १५, २००१
मुख्यालय अमेरिका
संकेतस्थळ [१]

विकिपीडिया ([२]) हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

विकिपीडियाची सुरुवात २००१ साली इंग्रजी भाषेत झाली. आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत ४० लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वांत विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.

विकिपिडीया हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्‍ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.

विकिपीडियाचा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे. मराठीचा पण यात समावेश आहे. अनेक मराठी भाषिक यास हातभार लावत आहेत.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार) सध्या यात ९६,१९८ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण एक कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

विकिपिडीया, विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरुनसुद्धा त्याच्या मुक्त सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विवीध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज इंटरनेट वरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरुन शोधता येतो.

विकिपीडियाची वैशिष्ट्ये

बाह्य दुवे

मनोगत

साचा:Link FA