"माज्या जल्माची चित्तरकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
(काही फरक नाही)

२३:२७, २१ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

माज्या जल्माची चित्तरकथा
चित्र:माज्या जल्माची चित्तरकथा.png
लेखक शांताबाई कांबळे
भाषा मराठी
देश महाराष्ट्र , भारत
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था उषा वाघ,सुगावा प्रकाशन.
प्रथमावृत्ती १९८२
चालू आवृत्ती बुध्दपौर्णिमा ,११ मे १९९८
मुखपृष्ठकार चंद्रकांत कांबळे.
विषय ISBN :8 1-86182-34-
पृष्ठसंख्या १५०
आय.एस.बी.एन. ISBN :8 1-86182-34-

माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.

दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली 'पूर्वा' मासिकात पथमतः छापण्यात आले.

पार्श्वभूमी

जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवय्राने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निव्ृत्त् झाली.

मालिका

या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे[१].

संदर्भ