लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर हे एक ऑस्ट्रियन नाटककार होत. त्याचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. त्याने काही काळ रंगभूमीवर नट म्हणून काम केले. त्याने जर्मन भाषेत सुमारे वीस बोधप्रद नाटके लिहिली असून त्यांत ऑस्ट्रियातील ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आढळते.

आपल्या नाट्यलेखनासाठी त्याने बोलीभाषेचा चांगला उपयोग करून घेतला. त्याचे तंत्र लोकनाट्यात्मक आणि विचारसरणी पुरोगामी होती. त्याच्या काही नाटकांतून निसर्गवादाची चाहूल लागते. Der Pfarrer von Kirchfeld (१८७०, इंग्रजी - शी प्रीस्ट ऑफ कर्कफील्ड) व Das Vierte Gebot (१८७७, इंग्रजी - शी द फोर्थ कमांडमेंट) ही त्याची काही विशेष महत्त्वाची नाटके आहेत.. याशिवाय त्याने काही कथा-कांदबऱ्याही लिहिल्या.

व्हिएन्ना येथे तो निधन पावला.