रामायणाचा काळ
Appearance
वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे, की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही संशोधन करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले आहेत.
रामायणकाळ इसवी सन पूर्व २००० पूर्वीचा नाही.
[संपादन]- भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्न करण्याची हौस आहे. पुरातत्त्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलीकडे जात नाहित. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खोऱ्यातील काही लोकांनी गंगेच्या खोऱ्यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पूर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी.बी. लाल यांनी केलेल्या उत्खननांवरून रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पूर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते.
- कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलीकडेे नेत नाहीत.
- भारतीय पुरातत्त्ववेत्ते एच.डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत.
- रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
- रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा व रामकाळी वानरसेनेने बांधला अशी श्रद्धा असलेला तरंगत्या पाषाणांच्या सेतूचेे वय, कार्बन डेटिंंगनुसार साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणणे मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरते.
- रामायणाचा काळ -रामायण रचनेच्या काळाबद्दल संशोधकात मतभेद आहेत. मूळ रामायणाची रचना बुद्धपूर्व काळात म्हणजे सन पूर्व पाचव्या शतकात झाली असावी असे श्री.कामिल बुल्के यांचे मत आहे.याकोबी,म्याक्डोनाल्ड,Vinternitz, मोनिअर विल्यम्स ,चि.वी.वैद्य यांचेही हेच मत आहे कीथ मात्र मूळरामायण सनपूर्व चौथ्या शतकात झाले असे मानतो. डॉ.शांतिकुमार नानुराम व्यास यांच्या मते वाल्मिकीचे मूळ रामायण पाणिनीच्या पूर्वी (सन पूर्व ८००) रचले गेले असले पाहिजे.कारण रामायणात संस्कृत भाषेचे अनेक आर्ष प्रयोग आढळतात .मूळ रामायणाचा विकास होत गेला त्या गोष्टीला कित्येक शतके लोटली असावी.प्रस्तुत रामायण हे इ .स.च्या दुसऱ्या शतकात निर्माण झाले, असे याकोबी व Vinternitz हे मानतात; तर चि.वी .वैद्य यांच्या मते हा काल अंदाजे स.पू. १०० हा येतो.श्री.महाराष्ट्रीय व श्री .बाळशास्त्री हरदास यांच्यामते हा काळ स.पू. २५२८ हा आहे.[१]
उपक्रमावरील चर्चा
[संपादन]रामायणाचा काळ आणि रामाला देवत्व केव्हा प्राप्त झाले या संदर्भात उपक्रमावर झालेली ही [१] Archived 2018-05-09 at the Wayback Machine. चर्चा वाचावी.
- ^ भारतीय संस्कृति कोश -खंड ८,पुनर्मुद्रण मार्च २०१०