Jump to content

राजकारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही[].

राजकारणाची व्याख्या

[संपादन]

"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्त्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण[].

''सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकाच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगीकारुन विशिष्ट समाज, समुह, संस्था, भूभाग यावर सत्ता मिळविण्यासाठी व सत्ता, प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण''

राजकारणाचा दृष्टिकोन

[संपादन]

राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे[].

आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.[ संदर्भ हवा ]

राजकारण हे केवळ निवडणुकी पुरता मर्यादित नाही .

राज्यशास्त्र हे राजकारणाचा अभ्यास, शक्ती संपादन आणि उपयोगाची तपासणी करतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Hague, Rod; Harrop, Martin (2013-05-31). Comparative Government and Politics: An Introduction (इंग्रजी भाषेत). Palgrave Macmillan. ISBN 9781137317865.
  2. ^ "Politics". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-23.
  3. ^ Hague, Rod; Harrop, Martin (2013-05-31). Comparative Government and Politics: An Introduction (इंग्रजी भाषेत). Palgrave Macmillan. ISBN 9781137317865.
  4. ^ Safire, William (2008). Safire's Political Dictionary (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195343342.