महदंबा
महादाईसा | |
---|---|
जन्म |
इ.स. १२३८ |
मृत्यू |
इ.स. १३०८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
वडील | वायेनायक |
आई | कमाईसा |
महादाईसा ऊर्फ महदंबा (जन्म : इ.स.१२३८; - इ.स.१३०८) ऊर्फ रूपाईसा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे. १३ व्या शतकात परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण त्यांना आई म्हणत.
व्यतिगत माहिती
[संपादन]महदंबा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचेच होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. ती वडिलांकडे परत आली. तिला भक्तिमार्गाची व परमार्थाची ओढ होती. परमार्थाच्या ओढीने प्रथम ती दादोसाच्या शिष्या झाली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.[१] संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. तिची भक्ती डोळस होती. बुद्धीची, चौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.
जन्मस्थळ
[संपादन]महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या आहेत. तसे त्यांचे कुटुंब हे आजची पुरी पांढरी जि. बीड येथील होते. परंतु नंतर सर्व कुटुंब हे रामसगाव येथे आले होते आणि हेच त्यांचे गाव झाले होते. लिळाचरित्रातील उपलब्ध पुराव्यानुसार त्या रामासगाव येथील असल्याचे सिद्ध होते.
काव्ये
[संपादन]- मातृकी सैवरं(स्वयंवर )
- गर्भकांड ओव्या
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १७. ISBN 978-81-7425-310-1.