Jump to content

बशर अल-अस्साद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बशर अल-अस्साद
بشار الأسد

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
जुलै १७ २०००

जन्म ११ सप्टेंबर, १९६५ (1965-09-11) (वय: ५९)
दमास्कस, सीरिया
व्यवसाय नेत्रतज्‍ज्ञ
सही बशर अल-अस्सादयांची सही

डॉ. बशर अल-अस्साद (अरबी: بشار الأسد ; सप्टेंबर ११ १९६५) हे सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते सीरियाच्या सैन्य दलाचे प्रमुख व सीरियाच्या सत्तारूढ बाथ पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहेत. बशर यांचे वडील हाफिज अल-अस्साद हे १९७१ ते २००० पर्यंत सलग ३० वर्ष सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. बशर यांनी १९८८ साली दमास्कस विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यालयातून पदवी संपादन केली आणि त्यांनी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. ४ वर्षांनंतर बशर यांनी नेत्ररोगशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी लंडन मधील वेस्टर्न आय हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. १९९४ साली त्यांच्या भावाचा एका कार अपघातामध्ये मृत्यू झाला व बशर यांना सीरीयामध्ये दुसरे उत्तराधिकारी म्हणून परत बोलावण्यात आले. ते सैन्य अकादमीमध्ये दाखल झाले व त्यांना लेबनॉन वरील कारवाईची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर २००० साली बशर यांनी अस्मा यांच्याशी विवाह केला.

जीवन

[संपादन]

राष्ट्राध्यक्ष म्हणून कारकीर्द

[संपादन]

सीरियातील यादवी युद्ध

[संपादन]

२६ जानेवारी २०११पासून बशर यांच्या राजवटीला विरोध सुरू झाला.

२०१० मध्ये रशियाचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्याबरोबर बशर अस्साद

बाह्य दुवे

[संपादन]