डेम पेनेलोपी मार्गारेट लाइव्हली (जन्म १७ मार्च १९३३) [१] ही एक ब्रिटिश लेखीका आहे जी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कल्पित कथा लिहिते. त्यांनी बुकर पारितोषिक (मून टायगर, १९८७) आणि ब्रिटिश मुलांच्या पुस्तकांसाठी कार्नेगी पदक (द घोस्ट ऑफ थॉमस केम्पे, १९७३) दोन्ही जिंकले आहेत.[२]
लाइव्हलींची प्रौढांसाठीची पहिली कादंबरी, द रोड टू लिचफिल्ड, १९७७ मध्ये प्रकाशित झाली आणि ती बुकर पारितोषिकासाठी शॉर्टलिस्ट केली गेली होती.[३] १९८४ मध्ये अकॉर्डींग टू मार्क ही कादंबरी देखील शॉर्टलिस्ट झाली होती. १९८७ मध्ये मून टायगर कादंबरीने ते पारितोषिक जिंकले.[४]
^(Carnegie Winner 1973). Living Archive: Celebrating the Carnegie and Greenaway Winners. CILIP. Archived copy of page at carnegiegreenaway.org.uk, Retrieved 17 August 2012.
^Dancing Fish and Ammonites: A Memoirfirst published October 10th 2013; Original Title: Ammonites and Leaping Fish: A Life in Time at goodreads.com, Accessed 24 April 2018