पॅरिसचा तह
Appearance
पॅरिसचा तह हा सप्टेंबर ३, इ.स. १७८३ रोजी ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील तह होता. नोव्हेंबर ३०, इ.स. १७८२ रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी अमेरिकन क्रांती पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.[१]
या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व बेंजामिन फ्रॅंकलिन, जॉन जे, हेन्री लॉरेन्स आणि जॉन ॲडम्स यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व डेव्हिड हार्टली आणि रिचर्ड ऑसवाल्ड यांनी केले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)