नाईक
नाईक (Naik/Nayak) हे भारतीय आणि पाकिस्तानी सेनेतील एक पद आहे. तमिळ भाषेमध्ये नाईक शब्दाचा वापर राज्याच्या राज्यपालाच्या संदर्भात केला जातो. मराठीतील नाईक शब्दाचा हिंदीत 'नायक' असा उल्लेख होतो.
भारतीय सैन्यामध्ये, नाईक हे लान्स नायक मधले पद आहे. राजपूत सैन्यामध्ये नायक ही पदे होती. तसेच मराठा सैन्यामध्ये नाईक-सरनाईक ही पदे होती. ओरिसामध्ये नायक-पट्टनायक ही पदे होती. यांवरूनच ब्रिटिशांनी नाईक हा शब्द भारतीय सैनिकांच्या बाबतीतही उपयोगात आणला.
'नाईक' ही समाजातील एक प्रतिष्ठित पदवी मानली जाते. साजा किंवा वसाहतीच्या प्रमुखांना नायक /नाईक म्हटल्या जाते. त्यावरून ही आडनाव देखील आहे. भारतीय राजकारणातील हरितक्रांतीचे जनक, वसंतराव नाईक (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र), सुधाकरराव नाईक (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र,राज्यपाल हिमाचल प्रदेश, राम नाईक (माजी केंद्रीय मंत्री), कविता नाईक (खासदार, तेलंगणा),रविंद्र नाईक (माजी मुख्यमंत्री, गोवा) , रामजी नाईक हे प्रचलित नाईक आडनाव असलेले व्यक्तीमत्व आहेत. नाईक हे आडनाव बहुतांशी राजपूत गोरराजवंशी बंजारा मध्ये असून त्यांच्या वसाहतीच्या प्रमुखाला नाईक (नायक) म्हणून ओळखले जाते. नाईक ही पदवी सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाते. गाव नगरीत नाईकाला आजही मानाचा स्थान दिले जाते. पूर्वी सामाजिक, सांस्कृतिक कार्यात नाईकाला पहिला मान दिला जात असे. ही प्राचीन परंपरा आजही गोरराजपूत बंजारामध्ये कायम आहे.