नरसिंगपूर-नीरा हे गाव पुणें जिल्ह्यातील इंदापूरच्या आग्नेयेस १२ मैलांवर भीमा व नीरेच्या संगमावर आहे. येथें श्री लक्ष्मीनरसिंहाचें देवालय आहे. विंचूरकरांनीं हें देवालय शके १६७८ मध्ये बांधिलें. वैशाख शुद्ध चतुर्दशीपासून येथें दोन दिवस जत्रा भरते.