Jump to content

तलाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तलाक हा इस्लाममधील विवाहविच्छेद (घटस्फोट, काडीमोड) होय. तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार केला की तलाक झाला असे समजले जाते. हा तिहेरी तलाक (ट्रिपल तलाक) टेलिफोनवरून किंवा 'व्हाॅट्सअप'सारख्या मीडियावरूनही देता येतो.

धर्मानुसार, तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक सुरू करू शकतात. प्रत्यक्षात फक्त पुरुष तलाक देताना आढळतात.

तलाकचे मुख्य पारंपरिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेऊन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन शरिया तथा पारंपरिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर प्रक्रियेपेक्षा वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, तलाक देण्याची वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याच्या संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते.

तलाक दिल्यानंतर परत त्याच स्त्रीशी विवाह करायचा असल्यास तिला एक रात्र परपुरु़ाबरोबर शय्यासोबत करावी लागते. याला हलाला असे म्हणतात. मीना कुमारीलाही या हलालमधून जावे लागले आहे.

तलाकविषयी मराठी पुस्तके

[संपादन]
  • तलाक : अभिशाप की वरदान (एच. ए. सिद्दिकी)
  • तिहेरी तलाक (कलीम-अजीम)