जनार्दन परब
Appearance
जनार्दन परब (इ.स. १९४५; २ एप्रिल. इ.स. २०१६ :मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत केली.
त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.
अभिनय असलेली मराठी नाटके
[संपादन]- अजब न्याय वर्तुळाचा
- अवध्य
- नकटीच्या लग्नाला
- काका किशाचा,
- मुद्रा राक्षस
- रात्र थोडी सोंगं फार
- संगीत विद्याहरण
- हमिदाबाईची कोठी
अभिनय आणि दिग्दर्शन असलेली मालवणी नाटके
[संपादन]- कबूतरखाना
- धुमशान
- नशीबवान धाव खावचो
दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट
[संपादन]- कुलस्वामिनी तुळजाभवानी
- गंमत जंमत
- नवरी मिळे नवऱ्याला
- माझा पती करोडपती
अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट
[संपादन]- आकांक्षा
- उडान
- ऐलान
- कसम
- क्रांतिवीर
- गंमत जंमत (मराठी)
- गुलाम
- गोष्ट एका जप्तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
- चायना गेट
- छावणी (मराठी)
- जिद्दी
- टपाल (मराठी)
- दरार
- नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
- नायक
- बंट्या टेलीव्हिजन (मराठी दूरचित्रवाणी मालिक)
- बाजीगर
- मुंगळा (मराठी)
- मुझे कितना प्यार हैं तुमसे
- मृत्युदाता
- शिकारी : दि हंटर
- सिंड्रेला (मराठी)
पुरस्कार
[संपादन]- कॉलेज साहित्य पुरस्कार
- नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, २००८
- शंकर घाणेकर पुरस्कार