Jump to content

गीतगोविंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्कृतमधील एक कृष्ण काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे.या काव्याचा विषय राधा-कृष्णांचा परस्पर अनुराग,विरह आणि मीलन असा आहे.चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे.रोमेश चंद्र दत्त,चिं.वि.वैद्य,डॉ.कीथ हे विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्यात गणना करतात.

स्वरूप

[संपादन]

सदर काव्य हे गेय अशा राग आणि तालात बांधलेले आहे.त्याचे चोवीस प्रबंध अथवा अष्टपाद्य आहेत. त्यांची बारा सर्गात विभागणी केलेली आहे.प्रत्येक प्रबंधाच्या आधी व नंतर विविध वृत्तात श्लोक रचलेले आहेत.

साहित्यिकदृष्ट्या महत्त्व

[संपादन]

या काव्यात संभोग- विप्रलंभ शृंगार यांचे वर्णन आहे; त्या जोडीने भक्तीपूर्ण रचनाही आहेत. उपमा,उत्प्रेक्षा,श्लेष इ. अलंकारांचा वापर या काव्यात केलेली दिसतो.

वर्ण्य विषय

[संपादन]

श्रीकृष्ण हा या काव्याचा नायक असून राधा ही नायिका आहे.तिची सखी हे आणखी एक पात्र यामध्ये आहे. ती सखी त्या दोघांच्यात मध्यस्थाचे काम करते.नायक नायिकांच्या अवस्था एकमेकांना सांगणे हे तिचे काम आहे. संस्कृत साहित्यात नोंदविल्या गेलेल्या अभिसारिका,वासकसज्जा,विप्रलब्धा इ. नायिकांचे प्रकार जयदेवाने या काव्यात वर्णन केलेले आहेत.

राधा कृष्ण आणि गोपींचे चित्र

अन्य

[संपादन]

केरळात 'अष्टपदी अटटम' नावाची एक नृत्यकला प्रचलित होती.ते नृत्य गीतगोविंदाच्या आधारे बसवलेले होते.

मराठी साहित्यात

[संपादन]

गीत गोविंदाची समश्लोकी मराठी काव्ये

  • भीष्माचार्य यांची 'महाराष्ट्र सुबोधिनी टीका'
  • तुका ब्रह्मानंद यांची 'प्राकृत समश्लोकी '
  • चेतोहरदेव यांची टीका
  • वसंत विहार यांचे गीतगोविंद
  • डॉ.श्रीखंडे रा.चिं. सुश्लोक गोविंद
  • राजा बढे यांचे शृंगार श्रीरंग []
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड ३, पृष्ठ ७-८