गाणपत्य संप्रदाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गाणपत्य या पानावरून पुनर्निर्देशित)

गाणपत्य संप्रदाय हा गणेश उपासकांचा महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो.[१][२]

गणपतीचे चित्र

स्थापना व प्राचीनत्व[संपादन]

ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते.

व्रत[संपादन]

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे या संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. श्री गणेश पुराण तसेच मुदगल पुराण ही या संप्रदायाची महत्त्वाची पुराणे मानली जातात.[३]

शाखा[संपादन]

नवनीत,स्वर्ण आणि संतान अशा या संप्रदायाच्या तीन शाखा आहेत.गणपती हीच सर्वोच्च देवता आहे असे मानून त्याचेच पूजन या शाखांचे अनुयायी भक्त करतात.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Hindī viśvakośa (हिंदी भाषेत).
  2. ^ Dāmodarapaṇḍita; Kamat, Ashok Prabhakar (1976). Ādya Mahārāshṭrīya Hindī kavi Ācārya Dāmodara Paṇḍita aura unakī kavitā (हिंदी भाषेत). Mahārāshṭra Rāshṭrabhāshā Sabhā.
  3. ^ गाडगीळ, अमरेंद्र. श्री गणेश कोश.
  4. ^ Upadhyay, Ramji (1966). Prācīna Bhāratīya sāhitya kī sāṃskr̥tika bhūmikā (हिंदी भाषेत). Devabhāratī Prakāśana [tathā] Lokabhāratī Prakāśana.