कुमार सानू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमार सानू

कुमार सानू
आयुष्य
जन्म सप्टेंबर २३, १९५७
जन्म स्थान कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत (पार्श्वगायन)

केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू (बंगाली: কুমার শানু ) (सप्टेंबर २३, १९५७ - हयात) हा बंगाली पार्श्वगायक आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. कुमार सानूने प्लेबॅक कारकीर्द सानू भट्टाचार्य या नावाने  सुरू केली. १९८६ मध्ये, शिबली सादिक दिग्दर्शित त्यांना  पहिला बांग्लादेशी चित्रपट 'तीन कन्या' मिळाला.  हिरो हिरालाल (१९८९)) या हिंदी चित्रपटामध्ये  बॉलीवूडचे पहिले गाणे गायले होते. १९८९ मध्ये जगजितसिंग यांनी कुमार सानूची ओळख मुंबईतील कल्याणजी-आनंदजीशी केली. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपले नाव "केदारनाथ भट्टाचार्य" वरून "कुमार सानू" केले कारण  कुमार सानू यांच्या  आवाज आणि गाण्यांच्या शैलीवर किशोर कुमार यांचा  जास्त प्रभाव होता.त्यानंतर कुमार सानू मुंबईत स्थायिक झाले तिथे त्यांना कल्याणजी-आनंदजींनी  जादूगर या चित्रपटात गाण्याची संधी दिली.१९९० च्या ‘आशिकी’ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक नदीम-श्रावण यांनी सानूला एका गाण्याशिवाय इतर सर्व गाण्याची संधी दिली

जीवन[संपादन]

कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरुवातीस कल्याणजी-आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिंदी भाषाउर्दू या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादेंकिशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला गुलशन कुमार याने नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर आशिकी या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी'ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.

आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा nice सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला. त्याने सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक गायक म्हणून सलग पाच फिल्मफेर पुरस्कार जिंकले. साजन (१९९१), दिवाना (१९९२), बाजीगर (१९९३)) आणि १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९४) या चित्रपटातील गाण्यांसाठी फिल्मफेर अवॉर्ड्स आले.१९९० ते १९९९ दरम्यान त्यांनी गाण्यासाठी  बॅक टू बॅक फिल्मफेर पुरस्कार जिंकले.

सन्मान[संपादन]

कुमार सानू हे गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी करतात. ८-७-२०१८ रोजी इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये कुमार सानू यांचा, त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला..

बाह्य दुवे[संपादन]