Jump to content

काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुख्य पान: मुंबई

साष्टीची बखर आणि महिकावतीची बखर यात तत्कालीन ठाणे जिल्हा म्हणजे सध्याची मुंबईच्या उपनगरांची वर्णने आहेत. एकोणिसाव्या शतकापासून आधुनिक मुंबईचे उल्लेख मराठी साहित्यात सापडतात. अरुण टिकेकरांचे यावर एक पुस्तक आहे.[ दुजोरा हवा] एकोणिसाव्या शतकात मुंबईची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने चौफेर वाढ झाली. त्याचे आलेख सर्वच क्षेत्रांतील साहित्यात उमटले आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, वि.ना. मंडलिक यांची चरित्रे, न.र. फाटक यांचा मुंबईचा इतिहास यांशिवाय कविता, कादंबऱ्या, लघुलेख यातूनही ते उमटते. ना.सी. फडके यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या, अनंत काणेकरांचे लेख, ह.ना. आपटे यांचे पण लक्षात कोण घेतो किंवा रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील आठवणी मध्येही मुंबई येते. भाऊ पाध्ये, मधु मंगेश कर्णिक, अनंत सामंत, [[श्री.ना.]पेंडसे]], अशोक शहाणे यांनी मुंबईवर आणि मुंबईच्या पार्श्वभूमीवर लिहिले आहे.[]

मुंबई दिनांक ही अरुण साधूंची मुंबईवर असलेली राजकारणाच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी. शिवाय सुकेतू मेहता यांनी लिहिलेलं Maximum City ही आहे. अरुण साधूंचीच झिपऱ्या, भाऊ पाध्यांची वासूनाका, याही मुंबईची पार्श्वभूमी असलेल्या काही कादंबऱ्या आहेत.[]

जयंत पवारांचे अधांतर हे नाटक गिरणीकामगारांच्या संपाने झालेल्या वाताहतीवर आहे. जयंत पवारांचाच 'फीनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा कथासंग्रह म्हणजे १९७० ते ९० या काळातील मुंबईच्या आत्मचरित्राचा पट मांडतो.[] नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे ह्यांची एक वेगळीच मुंबई. ललित मासिकाच्या एका बऱ्याच जुन्या दिवाळी अंकात श्री.ना. पेंडसे यांचा एक लेख होता. शिवाय गंगाधर गाडगीळ यांचे एक पुस्तक आहे. []

भाऊ पाध्ये यांनी राडा वगैरे कादंबरीत मुंबई दाखवली आहे. []

तसेच त्‍यांच्‍या वैतागवाडी या कादंबरीतही मुंबईतल्‍या मध्‍़यमवर्गीय लोकांच्‍या समस्‍यांवर भाष्‍य केले आहे.

चित्रपटांतील मुंबई

[संपादन]

देव आनंदच्या "टॅक्सी ड्रायव्हर" व इतर अनेक चित्रपटांत त्या काळातील मुंबई शहराचे दर्शन घडवले आहे. देव आनंदच्या आत्मचरित्रातही त्या काळातील मुंबई शहराचे वर्णन आहे.[] सी आई डी, (C.I.D. 1957) चित्रपटात कवी मजरूह सुल्तानपुरी यांचे गाणे 'ऐ दिल है मुशकिल जीना यहॉं' हे मोहम्मद रफ़ींनी गायले आहे.
ऐ दिल है मुश्किल जीना यहॉं
ज़रा हट के ज़रा बच के
ये है बम्बई मेरी जान
...

काव्य

[संपादन]

लावणीकार पठ्ठे बापुराव त्यांच्या मुंबई गं नगरी बडी बांका... पोवाड्यात मुंबईचे वर्णन खालील प्रमाणे करतात.

मुंबई गं नगरी सदा तरनी
व्यापार चाले मनभरुनी
दर्याच्या गो वरूनी
वरूनी जहाजे फिरती

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचेही एक छक्कड (लावणी) आहे, ती अशी :-

  • माझी मैना गावाकडं राह्यली

पितात सारे गोड हिवाळा ( कवी - बा. सी. मर्ढेकर )

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्ज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीची उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहरिस हिरवी झाडे, काळा वायू हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढऱ्यानी काळ्या, मिरवीत रंगा अन् नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुऱ्या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्घ्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा आहे

मुंबईत उंचावरी मलबार हिल चंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती
परळात राहणारे रातदिस राबणारे
मिळेल ते खाऊन घाम गाळती ||ध्रु||


.....

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]