कमल पाध्ये
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कमल पाध्ये (माहेरच्या कमल विनायक गोठोसकर-मुंबईतील रामवाडीच्या विनायक पांडुरंग गोठोसकर ऊर्फ विनायकभटजींची कमळी) या एक वैचारिक लेखन करणाऱ्या मराठी लेखिका होत्या. पत्रकार प्रभाकर आत्माराम पाध्ये हे त्यांचे पती. त्यांचे लग्न सन १९४० साली झाले. कमला पाध्ये यांना त्यांच्या “बंध अनुबंध” नावाच्या दर्जेदार आत्मचरित्रात्मक कादंबरीमुळे अफाट लोकप्रियता मिळाली.
कमल पाध्ये यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- बंध अनुबंध (आत्मचरित्र)
- भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास : १८५८ ते १९४७ (अनुवादित, मूळ पुस्तक The Indian Muslims लेखक - राम गोपाल)
- भारतीय स्त्रीधर्माचा आदर्श
पुरस्कार
[संपादन]- कै कमल प्रभाकर पाध्ये यांच्या नावाने प्रभाकर व कमल पाध्ये विश्वस्त निधीतर्फे समाजसेवेसाठी एक पुरस्कार ठेवला आहे. विद्या बाळ यांना हा पुरस्कार मिळाला होता.