ॲस्टेरिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅस्टेरिक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅस्टेरिक्सच्या साहसकथा
लेखक रेने गॉस्सिनीअलबर्ट उडर्झो
साहित्य प्रकार विनोद

अ‍ॅस्टेरिक्सच्या साहसकथा ही फ्रेंच भाषेतील एक चित्रकथामाला आहे. तिचे इंग्रजीसह अनेक जागतिक भाषांत भाषांतर झाले असून ती युरोपात व भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

या चित्रकथामालेत ३०हून अधिक चित्रकथा आहेत. (इ.स. २००९अखेरपर्यंत या मालिकेत ३४ साहसकथा आणि १ पुस्तिका प्रसिद्ध झाल्याची नोंद जालावर उपलब्ध आहे.) या मालिकेतील सुरुवातीच्या काही अंकांचे कथासूत्र आणि शब्दांकन श्री. रेने गॉसिनी यांनी व चित्रांकन श्री. आल्बेर उदेर्झो यांनी केले असून, श्री. रेने गॉसिनी यांच्या निधनानंतर त्यापुढील अंकांत श्री. आल्बेर उदेर्झो हे दोन्ही बाबी हाताळत आले आहेत.

कथासूत्र[संपादन]

काळः इ.स.पूर्व ५०. संपूर्ण गॉल देश (आजचा फ्रान्स) रोमन सेनेने पादाक्रांत केलेला आहे. नाही, अगदी संपूर्ण नाही. दुर्दम्य गॉलमंडळींचे एक खेडे अजूनही आक्रमकांना निकराने तोंड देत उभे आहे. आणि गावाला वेढून राहिलेल्या टोटोरम, अक्वेरियम, लॉडॅनम आणि कॉंपेंडियमच्या (सर्व नावे इंग्रजी - ब्रिटिश आवृत्तीप्रमाणे.) छावण्यांमधील रोमन सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणत आहे.

पात्रे[संपादन]

(सर्व नावे इंग्रजी-ब्रिटिश आवृत्तीप्रमाणे.)

गॉलमंडळी[संपादन]

अ‍ॅस्टेरिक्स[संपादन]

नावे: (Astérix: फ्रेंच आवृत्ती. Asterix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Asterix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

कहाणीचा नायक. पेशाने योद्धा. अंगचणीने बुटका. अतिशय धूर्त. गेटफिक्स ने बनवलेल्या जादुई आसवातून याला वाटेल तेवढ्या रोमन सैनिकांचा मुकाबला करायला प्रचंड शक्ती मिळते. गावातील डोके शाबूत असलेल्या फार थोड्या व्यक्तींपैकी एक. त्यामुळे कोणत्याही धाडसी, धोकादायक किंवा गावाकरिता महत्त्वाच्या मोहिमा याच्यावर सोपवल्या जातात, आणि हा त्या मोहिमा हमखास पार पाडतोच पाडतो.

ओबेलिक्स[संपादन]

नावे: (Obélix: फ्रेंच आवृत्ती. Obelix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Obelix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

अ‍ॅस्टेरिक्सचा परममित्र, आणि जेथे जातो तेथे अ‍ॅस्टेरिक्सचा सांगाती. लहानपणी हा चुकून गेटफिक्सच्या जादुई आसव बनवण्याच्या हंड्यात पडला होता, त्यामुळे त्या आसवाचा त्याच्यावर कायमचा परिणाम झालेला आहे. आसव न पिताच याच्यात प्रचंड शक्ती आहे, आणि अनेकांना एकाच वेळी पुरून उरू शकतो. जादुई आसव पिण्यास याला बंदी आहे, कारण अगोदरच त्या आसवाचा याच्यावर कायमस्वरूपी परिणाम झालेला असताना त्याला अधिक आसव पिऊ देणे हे त्याच्या प्रकृतीला - आणि विशेष करून मनःस्वास्थ्याला - बाधक ठरेल, असे गेटफिक्सचे म्हणणे आहे. गलेलठ्ठ. (मात्र याला कोणी गलेलठ्ठ म्हटलेले आवडत नाही. स्वतःचे वर्णन तो 'माझी छाती चुकून खाली घसरली' असे करतो. याला ऐकू येण्याच्या अंतरात याला गलेलठ्ठ म्हणणाऱ्याचे काही खरे नसते.) डोक्याने मठ्ठ्. पण मनाने तितकाच चांगला.

धंदा: मेनहिरे बनवणे.

आवडते छंदः[संपादन]

रानडुकरांची शिकार[संपादन]
रोमन सैनिकांना बदडून काढणे[संपादन]

गेटफिक्स[संपादन]

नावे: (Panoramix: फ्रेंच आवृत्ती. Getafix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Magigimmix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

वायटलस्टॅटिस्टिक्स[संपादन]

नावे: (Abraracourcix: फ्रेंच आवृत्ती. Vitalstatistix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Macroeconomix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

डॉगमॅटिक्स[संपादन]

नावे: (Idéfix: फ्रेंच आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Dogmatix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

कॅकोफॉनिक्स[संपादन]

नावे: (Assurancetourix: फ्रेंच आवृत्ती. Cacofonix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Malacoustix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

अनहायजीनिक्स[संपादन]

नावे: (Ordralfabétix: फ्रेंच आवृत्ती. Unhygienix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Epidemix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

गावातील मासेविक्या.

टीपः हा मासेविक्या आहे, कोळी नव्हे. गाव समुद्रकिनारी असूनही हा स्वतः कधीही मासे पकडत नाही. लुटेशियाहून (आजचे पॅरिस) 'फक्त अधिकृत छापाचे' मासे मागवतो आणि विकतो. ते बैलगाडीतून गावी पोहोचेपर्यंत अर्थातच खाण्यालायक अवस्थेत नसतात. मग गावात नित्याच्याच असलेल्या गावकऱ्यांच्या मारामाऱ्यांमध्ये एकमेकांना मनसोक्त बदडून काढण्यासाठी याच्या माशांचा उपयोग होतो. कधीकधी तर या कामासाठी त्याचे मासे भाड्यानेही घेतले जातात, आणि काम फत्ते झाले की साभार परतही केले जातात.

फुल्लीऑटोमॅटिक्स[संपादन]

नावे: (Cétautomatix: फ्रेंच आवृत्ती. Fulliautomatix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती.) तिरपी मुद्राक्षरे===जेरियाट्रिक्स=== नावे: (Agecanonix: फ्रेंच आवृत्ती. Geriatrix: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Arthritix: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

इंपेडिमेंटा[संपादन]

नावे: (Bonemine: फ्रेंच आवृत्ती. Impedimenta: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Belladonna: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

बॅक्टेरिया[संपादन]

नावे: (Iélosubmarine: फ्रेंच आवृत्ती. Bacteria: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती.)

श्रीमती जेरियाट्रिक्स[संपादन]

पॅनेकिया[संपादन]

नावे: (Falbala: फ्रेंच आवृत्ती. Panacea: इंग्रजी - ब्रिटिश आवृत्ती. Philharmonia: इंग्रजी - अमेरिकन आवृत्ती.)

चांचेमंडळी[संपादन]

रेडबियर्ड[संपादन]

पेगलेग[संपादन]

रोमन[संपादन]

ज्युलियस सीझर[संपादन]

इतर[संपादन]

क्लिओपात्रा[संपादन]