अश्विनी धोंगडे
अश्विनी धोंगडे | |
---|---|
जन्म नाव | अश्विनी धोंगडे |
जन्म |
जानेवारी २१, इ.स. १९४७ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखिका, कवयित्री, समीक्षक, प्राध्यापिका |
साहित्य प्रकार | कविता, समीक्षा, अनुवाद |
वडील | द.के. बर्वे |
पती | डॉ. रमेश धोंगडे |
अपत्ये | शार्वेय धोंगडे, शताक्षी धोंगडे-देव |
संकेतस्थळ | http://ashwinidhongde.com |
डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे (जन्म : पुणे, २१ जानेवारी १९४७) ह्या एक मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी तीन कविता संग्रह, सहा कादंबऱ्या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयांवर १९ पुस्तके लिहिली आहेत. एम.ए. (इंग्रजी) झाल्यावर १९७१ पासून त्यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयात इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. पुढे ‘जाहिरातींची भाषाशैली’ (Linguistic Analysis of Commercial Display Advertisements) या विषयात डॉक्टरेट केली. तसेच इंग्रजीची प्रबंध मार्गदर्शिका व परीक्षक म्हणून काम केले.[१]
अश्विनी धोंगडे या कथालेखक द.के. बर्वे यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. आश्विनी धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले. त्या लेखक रमेश वामन धोंगडे यांच्या पत्नी आहेत.
अश्विनी धोंगडे उत्तर कोरियात एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. त्यावर त्यांनी 'देशांतर' हे प्रवास वर्णन लिहिले तसेच फिनलंडच्या प्रवासावर त्यांनी मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हे पुस्तक लिहिले.
अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीवादी स्वरूप आणि उपयोजना' या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.
त्यांनी अनेक ठिकाणे स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचा दर्जा याबद्दल २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत 'अजुनी चालतेची वाट' ह्या सदराचे लेखन २०१५ मध्ये वर्षभर केले. लॅंग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
अश्विनी धोंगडे या सासवड येथे २०१८ साली भरलेल्या २१व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
पुस्तके
[संपादन]- अनुत्तर (एकांकिका)
- अन्वय (कवितासंग्रह)
- अपौरुषेय (कवितासंग्रह)
- ॲम्बुश कथा मतदानाच्या: (दबा धरून हल्ला), कथा मतदानाच्या (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : आलोक शुक्ल)
- अर्धे आकाश (वैचारिक)
- आमचा लढा आमचा संघर्ष (स्त्रीविषयक, वैचारिक)
- एक होते झाड (बालवाङ्मय)
- घरकोंबडा
- जगणे व्हावे सुंदर म्हणुनी (ललित)
- जादूूचा कंठा (बालवाङ्मय)
- जास्मिन (रूपांतरित कादंबरी)
- तेजोनिधीच्या शलाका (सहलेखिका: डाॅ. सुप्रिया अत्रे, डाॅ. प्रिया जामकर)
- देशांतर (प्रवास वर्णन)
- पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिंग्टन स्क्वेअर)
- बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक)
- बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक)
- बाळंतपण: बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित)
- बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य)
- मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन) (सहलेखिका: शताक्षी धोंगडे देव)
- मनस्वी (कथासंग्रह)
- मराठी भाषा आणि शैली (सहलेखक - डॉ. रमेश धोंगडे)
- मार्टिन ल्युथर किंग ... अमेरिकेतील दलित-शोषित कृष्णवर्णीय समा ...वर्तमान
- यशच्या कल्पक कथा (बालसाहित्य)
- सडकछाप (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - मेहेर पेस्तनजी)
- संदर्भ स्त्री पुरुष (माहितीपर)
- सारी देवाची लेकरे (बालवाङ्मय)
- सुदर्शना आणि इतर कथा (बालसाहित्य)
- स्त्रीवादी समीक्षा: स्वरूप आणि उपयोजन (स्त्रीविषयक)
- स्त्री-सूक्त (कवितासंग्रह)
- स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण)
- होरपळ आणि स्पर्श (कादंबरी)
अश्विनी धोंगडे यांना मिळलेले पुरस्कार
[संपादन]- कमल व के.पी.भागवत पारितोषिक: स्त्रीविषयक ग्रंथ - बायकांविषयी बरेच काही या पुस्तकासाठी.[२]
- दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार: यशच्या कल्पक कथा: मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३ [३]
- न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे
- बंधुता प्रतिष्ठान : प्रेरणा पुरस्कार १९९९[४]
- बाबुराव शिरोळे पारितोषिक : साहित्य परिषद २००८
- भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा शारदा पुरस्कार - 'देशांतर'साठी
- उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार : मराठी भाषा आणि शैली १९८८
- पुण्याच्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा 'गदिमा' साहित्य पुरस्कार - अपौरुषेय या पुस्तकाला (१९९९)
- मराठी बालकुमार साहित्य संमेलनातील आजचे बालसाहित्य या विभागात प्रथम पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा: मराठी वाङ्मय निर्मितीसाठी राज्य पुरस्कार (कवी केशवसुत पारितोषिक (१९८८-८९)) - स्त्रीसूक्त या कवितासंग्रहासाठी,
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार - संदर्भ स्त्री पुरुष या पुस्तकासाठी (२००६)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक (कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार) - स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८८)
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा: यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (मार्च २००४)
- श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळाचा कवितासंग्रहासाठीचा पुरस्कार : स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८९)
- युगवाणी नागपूरचा सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कार - अनुत्तरित या एकांकिकेला
- डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळाला आहे.
- नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचा सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कार - 'ये रे घना'ला.
- डॉ. वि.भि. कोलते समीक्षामित्र संस्थेचा ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार - बायकांविषयी बरेच काही या पुस्तकाला.
- श्रीपूर (सोलापूर)चा प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार,
- मुंबई-सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिराचे बालकथांसाठीचे पारितोषिक -: सुदर्शना आणि इतर कथा या पुस्तकाला
- डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक
संदर्भ
[संपादन]
- ^ http://ashwinidhongde.com Archived 2017-10-09 at the Wayback Machine. अधिकृत संकेतस्थळ
- ^ Mehta Marathi Granthjagat June 20. Mehta Publishing House. 2014-06-12.
- ^ "Awards – Dilipraj Prakashan Pvt. Ltd" (इंग्रजी भाषेत). 2022-01-21 रोजी पाहिले.
- ^ "पाटील, धोंगडे यांना बंधुता प्रतिष्ठानचा पुरस्कार". www.bytesofindia.com. 2022-01-21 रोजी पाहिले.[permanent dead link]