रमेश धोंगडे
डॉ.रमेश वामन धोंगडे (जन्म: १९४३) एक भाषाविज्ञानशास्त्रज्ञ आहेत.
अनुक्रमणिका
शिक्षण[संपादन]
डॉ. धोंगडे यांनी इंग्रजी आणि भाषाविज्ञानशास्त्रात एम.ए. केले आहे. तसेच त्यांनी भाषाविज्ञानशास्त्रात डॉक्टरेट केली आहे.
कारकीर्द[संपादन]
डॉ. धोंगडे डेक्कन महाविद्यालयात १९६५ ते १९७८ या काळात इंग्रजीचे प्राध्यापक होते. १९७८ ते १९८० या काळात ते एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबई येथे उपयोजित भाषाविज्ञान (अप्लाइड लिंग्विस्टिक्स) हा विषय शिकवायचे. डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ (१९८० - २००३) येथे त्यांनी भाषाविज्ञान विषय शिकवला आणि भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख असताना २००३ साली ते निवृत्त झाले. ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अभ्यागत प्राध्यापक होते. (२०१३-२०१६) या काळात त्यांनी मराठी भाषेच्या मालवणी आणि आगरी बोलीभाषांचे सर्वेक्षण केले. सिंबायोसिस विद्यापीठ, पुणे येथे त्यांनी सल्लागार आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून देखील काम केले आहे. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.