Jump to content

अनुराधा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
অনুরাধা পাটিল (bn); Anuradha Patil (nl); Anuradha Patil (ast); अनुराधा पाटील (hi); अनुराधा पाटील (mr); ଅନୁରାଧା ପାଟିଲ (or); Anuradha Patil (ga); Anuradha Patil (sq); Anuradha Patil (en); ਅਨੁਰਾਧਾ ਪਾਟਿਲ (pa) poetessa indiana (it); poétesse indienne (fr); poeta indiarra (eu); poeta india (ast); poetessa índia (ca); Marathi writer (en); Marathi writer (en); ମରାଠୀ କବୀ (or); poeta india (gl); poetisa india (es); poetisa indiana (pt); Indiaas dichteres (nl)
अनुराधा पाटील 
Marathi writer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल ५, इ.स. १९५३
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनुराधा पाटील (५ एप्रिल, १९५३:पहूर, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा - ) या मराठी कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका आहेत. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एस.एस.सी. (इंग्रजी सोडून मॅट्रिक), आर.टी. लेले हायस्कूल, पहूर येथे केले.

वीस समीक्षकांनी त्यांच्या कवितांचे दर्शन दादा गोरे संपादित अनुराधा पाटील यांची कविता' या पुस्तकात केले आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]

कविता संग्रह

[संपादन]
  • दिगंत (१९८१,१९९०,१९९२)
  • तरीही (१९८५, १९९७)
  • दिवसेंदिवस (१९९२,१९९७)
  • वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (२००५)
  • कदाचित अजूनही (२०१७)

प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथा

[संपादन]
  • नवसाला पावली डॉक्टरीण

अनुवाद

[संपादन]

पाटील यांच्या कवितांचे हिंदी अनुवाद

  • दर असल (२०१२) - अनुवादक - प्रा. निशिकांत ठकार
  • अनुराधा पाटिल री टाळवीं मराठी कवितावां : राजस्थानी अनुवाद (२०१८) -
  • हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, जपानी इत्यादी भाषांमध्ये व भाषांमधील वाङ्मयीन नियतकालिकांतून अनुवाद प्रसिद्ध. त्यात हिदी व इंग्रजी वाङ्मयीन नियतकालिकांमधून मोठ्या प्रमाणावर अनुवाद प्रसिद्ध.

इतर साहित्य

[संपादन]
  • काही कथा
  • उडिया कवितांची भाषांतरे
  • हिंदी कथा व कवितांची भाषांतरे
  • समकालीन कवितेवर समीक्षणपर लेख
  • वाङ्मयीन मुलाखती व भाषणे

पुरस्कार

[संपादन]
  • 'दिगंत' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाबद्दल पुरस्कार- १९८१
  • 'तरीही' साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार - १९८६
  • 'तरीही' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार- १९८६
  • 'तराही' ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६ - ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्यपुरस्कार - १९९३
  • 'दिवसेंदिवस' ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्यपुरस्कार - १९९३
  • 'दिवसेंदिवस' ला महाराष्ट्र फाऊंडेशन, न्यूयाॅर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मय लेखनाचा पुरस्कार - १९९४
  • शिवार प्रतिष्ठान, जिंतूर या संस्थेचा पहिला संत जनाबाई वाङ्मय पुरस्कार - २००१
  • सूर्याेदय सर्वसावेशक मंडळ, जळगाव या संस्थेचा पहिला मराठी साहित्यभूषण पुरस्कार- २०१०
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार, कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
  • कवी हरिश्चंद्र राय साहनी - दुःखी काव्यपुरस्कार, जालना कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
  • साहित्यप्रेमी भगिनीमंडळ, पुणे या संस्थेचा कवितालेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी -२०११
  • बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशन, जळगाव या संस्थांचा 'बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मयपुरस्कार पुरस्कार', प्रभावशाली कवी म्हणून - २०११
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा.रा. तांबे पुरस्कार, हयातभर कवितेच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कार्यासाठी. - २०१३
  • साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा 'दिवसेंदिवस' या पुस्तकाच्या 'दरअसल' या प्रा. निशिकांत ठकार यांनी केलेल्या अनुवादाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.- २०१४
  • 'पळसखेडे येथून नुकताच सुरू झालेला एक लाख रुपयांचा पहिला रानगंध पुरस्कार - २०१८
  • दीपा निसळ स्मृतिवाङ्मयपुरस्कार, अहमदनगर - २०१८
  • गोमंत विद्या निकेतन, मडगाव, गोवा : कविवर्य कारे 'गोमंती' काव्यपुरस्कार - २०१९
  • 'कदाचित अजूनही' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार - २०१९

संदर्भ

[संपादन]

https://moresangita.blogspot.com/2019/12/blog-post_26.html