Jump to content

सदस्य:Apeksha Bhandare

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जमुना बोरो (जन्म ७ मे १९९७,बेल्सिरी ) ही एक भारतीय हौशी बॉक्सर आहे. ती आसाममधील ढेकियाजुली शहरातील आहे. २०१९ साली रशियामध्ये झालेल्या एआयबीए जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जमुना बोरोने कांस्यपदक पटकावले होते. विशेष म्हणजे ही तिची पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.[] त्याचवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. []त्यांनतर इंडोनेशियात 23व्या प्रेसिडेंट कप बॉक्सिंग ओपन टुर्नामेंटमध्ये ती अव्वल खेळाडू ठरली.[]

वैयक्तिक माहिती आणि पार्श्वभूमी

[संपादन]

जमुनाचा जन्म ७ मे १९९७ रोजी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली शहराजवळील बेल्सिरी गावात झाला. ती सहा वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिच्या आईने स्वबळावर भाज्या आणि चहा विकून तिला मोठे केले. []

व्यावसायिक यश

[संपादन]

जमुना आज भारताच्या अग्रगण्य महिला बॉक्सरपैकी एक असली तरीही तिच्या कारकिर्दीची सुरुवात वुशू  या खेळापासून झाली. एकदा वुशूच्या काही खेळाडूंना सराव करताना पाहून तिला खेळांमध्ये रस निर्माण झाला. तिने प्रशिक्षक जॉन स्मिथ नरझरी यांच्याकडून वुशू खेळायला सुरुवात केली. त्यांनी जमुनाला गुवाहाटी येथील स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या प्रादेशिक उपकेंद्रात बॉक्सिंग निवड शिबिरात नेले. तिथे तिची निवड झाली आणि बॉक्सिंगसाठीचे प्रशिक्षण सुरू केले.[]

२०१० मध्ये बोरोने तामिळनाडूतील इरोड येथे झालेल्या पहिल्या सब-जुनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ५२ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले. २०११मध्ये तामिळनाडूतील कोयम्बतूर येथे झालेल्या दुसऱ्या आवृत्तीत याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.[]

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने पहिले सुवर्ण पदक २०१३ मध्ये सर्बियातील दुसऱ्या नेशन्स कप सब जुनिअर गर्ल बॉक्सिंग स्पर्धेत पटकावले. [] २०१४ मध्ये रशियातील आणखी एका स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले.[] २०१५ मध्ये ताइपेई येथे युथ वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत ५७ किलो वजन गटात तिने कांस्य पदक जिंकले. [] २०१८ मध्ये सर्बियातील बेलग्रेड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. [१०]त्यानंतरच्या वर्षी गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियामध्ये २३व्या प्रेसिडेंट कप बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय ओपन टुर्नामेंटमध्येही तिने  सुवर्णपदक मिळवले.[११] [१२]त्याचवर्षी जमुनाचा रशियाच्या उलान-उडे येथे एआयबीए वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य सामन्यात पराभव झाला, मात्र तिने देशाला कांस्यपदक मिळवून दिले.[१३]

जमुना बोडो आसाम रायफल्समध्ये नोकरी करते. [१४] क्रीडा व्यवस्थापन फर्म इन्फिनिटी ऑप्टिमल सोल्युशन्स (आयओएस) तिचे व्यावसायिक आणि आर्थिक करारांचे काम सांभाळते.[१५]२०१९ मध्ये प्रतिदिन या आसामच्या सुप्रसिद्ध मीडिया गटाकडून जमुना बोरोला अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.[१६]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jamuna Boro settles for bronze in AIBA Women's World Boxing Championships". The New Indian Express. 2021-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ PTI. "India Open gold medallist Jamuna Boro's incredible story, starring her mother Nirmala". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ Desk, Sentinel Digital (2019-07-28). "23rd President's Cup: Assam's Jamuna Boro Clinches Gold By Defeating Italian Giulia Lamagna - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  4. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  6. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  7. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  8. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  9. ^ "मां बेचती हैं सब्ज़ी और बेटी इंटरनेशनल बॉक्सर". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-06-27. 2021-02-17 रोजी पाहिले.
  10. ^ Desk, Sentinel Digital (2018-04-30). "Jamuna wins silver - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  11. ^ PTI. "India Open gold medallist Jamuna Boro's incredible story, starring her mother Nirmala". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  12. ^ Desk, Sentinel Digital (2019-07-28). "23rd President's Cup: Assam's Jamuna Boro Clinches Gold By Defeating Italian Giulia Lamagna - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  13. ^ "Jamuna Boro settles for bronze in AIBA Women's World Boxing Championships". The New Indian Express. 2021-02-17 रोजी पाहिले.
  14. ^ PTI. "World Women's Boxing Championships: Jamuna Boro enters pre-quarters, gives India winning start". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  15. ^ India, Press Trust of (2019-11-15). "Business Standard India".
  16. ^ "BBC News मराठी".

पुरस्कार

[संपादन]

प्रतिनिधित्व : भारत

कांस्य : 2019 एआयबीए जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, उलान-उडे रशिया.

सुवर्ण : 2019 इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग टुर्नामेंट,  गुवाहाटी.

सुवर्ण : 2019 प्रेसिडेंट कप बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय ओपन टुर्नामेंट, इंडोनेशिया

रौप्य: 2018 बेलग्रेड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, सर्बिया

कांस्य: 2015 युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, ताइपेई

सुवर्ण : 2013 नेशन्स कप इंटरनॅशनल सब जुनिअर गर्ल बॉक्सिंग टुर्नामेंट, सर्बिया.


Apeksha Bhandare
वैयक्तिक माहिती
Full name जमुना बोरो
Nationality भारतीय
जन्म 7 मे 1997(वय 23वर्षे )
बेल्सिरी (सोनितपूर), आसाम
Sport
खेळ बॉक्सिंग (मुष्टियुद्ध)