ॲरिझोना विद्यापीठ
युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना | |
ॲरिझोना विद्यापीठाचा दर्शनी भाग | |
स्थापना | १८८५ |
---|
ॲरिझोना विद्यापीठ (इंग्रजी:युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना) हे अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील तुसॉन शहरातील सार्वजनिक (सरकारी विद्यापीठ) आहे. १८८५ मध्ये १३ व्या 'अॅरिझोना प्रादेशिक विधानमंडळाने' स्थापन केलेले हे अॅरिझोना प्रदेशातील पहिले विद्यापीठ होते. हे विद्यापीठ 'ॲरिझोना बोर्ड ऑफ रीजेंटद्वारे' शासित असलेल्या तीन विद्यापीठांपैकी एक आहे. २०२३ साली या विद्यापीठात १९ स्वतंत्र महाविद्यालये/शाळांमध्ये ५३,१८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला.
ॲरिझोना विद्यापीठाचे वर्गीकरण "R1: डॉक्टरेट विद्यापीठे - अतिशय उच्च संशोधन क्रियाकलाप" मध्ये केले आहे. हे विद्यापीठ अमेरिकन विद्यापीठांच्या असोसिएशनचा सदस्य आहे. याच सोबत सदरीलविद्यापीठ 'बॅनर - युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर तुसॉन' आणि 'बॅनर - युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर फिनिक्स' या दोन शैक्षणिक वैद्यकीय केंद्रांशी संलग्न आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "IPEDS-University of Arizona". January 16, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 7, 2021 रोजी पाहिले.