६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू

६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को हा एक् धूमकेतू आहे. युक्रेनचे खगोलशास्त्रज्ञ किम एव्हानोविच आणि स्वेतलाना इव्हानोव्हा गेरासिमेन्को यांनी इ.स.१९६९ मध्ये हा शोधला आहे. हा धूमकेतू ताशी एक लाख ३५ हजार कि.मी. या वेगानं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

स्वरूप[संपादन]

छोटय़ा बर्फाच्या गोळ्यासारख्या धूमकेतूमध्ये विश्वातील मूळ अवशेष दडलेले आहेत असा अंदाज आहे. सौरमाला तयार झाल्यानंतर राहिलेले अवशेष या धूमकेतूंनी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी त्यांच्यात साठवून ठेवले आहेत असे मानले जाते.

अवकाश मोहिम[संपादन]

रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जात आहे. युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाशयान २ मार्च २००४ मध्ये या धूमकेतूच्या दिशेने पाठवले होते. या मोहिमेत धुमकेतूचा उपग्रह आणि अवरतरक (लँडर) असे दोन भाग आहेत. त्यामुळे कक्षेतून धूमकेतूचे निरीक्षण आणि धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या फिली अवतरक (लँडर) असे त्याचे दोन भाग आहेत. अवतरकाने तेथे खणायला सुरुवात केली त्यामुळे तेथूनही नमुने किंवा त्यांची छायाचित्रे मिळत आहेत. या मोहिमेद्वारे धूमकेतूची घनता, त्यावरील तापमान, वातावरण, त्यामध्ये असलेली खनिजे, रासायनिक मूलद्रव्य, त्यात असलेले वायू यांची माहिती मिळू शकेल. धूमकेतूवर यान उतरवण्याची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे.

हे सुद्धा पाहा[संपादन]