हॅले धूमकेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हॅले धूमकेतू

हॅलेचा धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.