५ एस (पद्धत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

५ एस ही एक जपान मध्ये विकसित झालेली कार्यस्थळ संगठन पद्धति आहे. ५ एस हे "एस" पासून सुरू होणाऱ्या पांच जपानी शब्द : सेईरी , सेईतोन , सेईसो , सेईकेत्सू व शित्सुके (रोमन लिप्यंतरण: seiri, seiton, seiso, seiketsu व shitsuke ) यांचे पासून बनलेले आहे. "५ एस"च्या या ५ प्राथमिक क्रियांचा साधारण अर्थ - वर्गीकरण, सरलीकरण, व्यवस्थित सफाई, मानकीकरण, व सुरू ठेवणे असा आहे. याशिवाय. सुरक्षा, बचाव , व संतुष्टि / समाधान ; हे अतिरिक्त तीन चरण आहेत. या ५ क्रियांद्वारे कार्यकुशलता व प्रभावशीलता वाढवण्यासाठी कार्यस्थळ कशा प्रकारे सुव्यवस्थित करता येईल याचा विचार करून त्याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यां कडून ही पद्धती राबवली जाते. ही पद्धत टोयोटा उत्पादन पद्धतीचा एक भाग आहे.