५वे पायदळ (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाचवे भारतीय पायदळ हे ब्रिटिश लष्करांतर्गत उभारलेले सैन्यपथक होते. १९३९ ते १९४५ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या सैन्यपथकाला आगीचा गोळा असे टोपणनाव मिळाले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांतर्फे इटली, जपान आणि जर्मनी या तीन बलाढ्य राष्ट्रांच्या सैन्याशी लढलेल्या काही पथकांमधील हे एक होते.

याची रचना १९३९मध्ये सिकंदराबादमध्ये दोन ब्रिगेड सह झाली. १९४०मध्ये या पथकास सुदानला पाठविण्यात आले व प्रत्येकी तीन बटालियनच्या तीन ब्रिगेडी उभारण्यात आल्या. १९४०-४१मध्ये हे सैन्यपथक एरिट्रिया आणि इथियोपियामध्ये लढले व तेथून इजिप्त, सायप्रस आणि इराकमध्ये गेले. १९४२च्या अल अलामीनच्या लढाईत ५व्या पायदळाने भाग घेतला होता. १९४३-४५ दरम्यान हे सैन्यपथक म्यानमार येथे गेले व तेथे त्यांनी जपान्यांशी लढाई केली. महायुद्धाच्या अंतानंतर ५वे पायदळ जावामध्ये गेले व तेथील स्वातंत्र्यसैनिकांविरुद्धच्या कारवायांत त्याने भाग घेतला. १९४५च्या शेवटी या सैन्यपथकाचे विसर्जन करण्यात आले.