२०१९ बालाकोट हवाई हल्ला
भारतीय वायुसेनाने हवाई हल्ले करण्याचा दावा केला | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | हवाई हल्ला | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | २०१९ भारत-पाकिस्तान वाद | ||
स्थान | बालाकोट, Balakot Tehsil, Mansehra District, Hazara Division, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान | ||
तारीख | फेब्रुवारी २६, इ.स. २०१९ | ||
मृत्युंची संख्या |
| ||
जखमींची संख्या |
| ||
| |||
२०१९चा बालाकोट हवाई हल्ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बालाकोट शहरावर केलेला हल्ला होता. हा हल्ला २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आलेला आहे असे भारतीय सैन्याने सांगितले.[१] भारताच्या शासकीय संस्थाद्वारे असे सांगितले जात आहे की, भारतीय हवाई दलाने जैश-ए-महोम्मद या आतंकवादी गटाच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला आणि त्यात जवळपास ३५० प्रशिक्षणार्थींना ठार केले आहे. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताच्या भूमीवर परत आलेली आहेत. त्यात भारतीय हवाई दलाला कोणतीही क्षती झालेली नाही .[१][२]
पाकिस्तानच्या सैन्यदलाने असे जाहिर केले आहे की, जेव्हा भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मुझफराबाद येथे घुसखोरी करून पाकिस्तानच्या सीमेचे उल्लंघन केले. त्यावर पाकिस्तानी विमानांनी उलट जबाबी कारवाई केली आणि भारतीय विमानांना घाईने परतावे लागले. त्या घाईमध्ये भारतीय विमानांनी त्यांचा पे-लोड म्हणजेच जास्तीचे जड सामान आणि इंधन मोकळ्या जागेत सोडून दिले. जरी ते पाकिस्तानच्या भूभागात पडले असले तरी त्यामुळे कोणतीही जिवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही.[३][४]
याच घटनेबरोबरच भारत-पाक सीमेवर गोळीबारी सुरू झाली आणि त्यात नियंत्रण रेषेलगतच्या भागात पाकीस्तानच्या चार नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.[५]
१९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर दोन्हींही देश अणवस्त्र धारी झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन सैनिकी कारवाई केलेली आहे .[६][a]
पार्श्वभूमी
[संपादन]१४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारा भारतीय सैन्याचा जत्थ्यावर लेथीपूरा, पुलवामा जिल्हा, जम्मू आणि काश्मिर येथे एका आत्मघाती गाडीने हल्ला केला. या हल्ल्यात आत्मघातकी गटासह भारतीय केंद्रिय आरक्षित पोलीस दलाचे ४६ जवान जागीच ठार झाले.[८] या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मुहमद या पाकिस्तान स्थित आदंकवादी गटाने स्वीकारली आहे.[९][१०][११] पाकिस्तानने या भारतीय सैनिकांवरील हल्ल्याचा निषेध केला असून या आतंकवादी गटाशी पाकिस्तान सरकारचे कोणतेही संबंध असल्याचा नकार दिलेला आहे.[१२]
हा हवाई हल्ला २०१९ च्या भारतीय सामान्य निवडणूकांच्या काही काळ आधीच केला गेलेला आहे.[१३][१४] १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या प्रतानमंत्र्यांनी भारतीय सरकारने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला आहे असा आरोप केला आहे.[१५][१६] भारत सरकारने हे आरोप नाकारलेले आहेत.[१५]
आधीच्या काही तपासांमध्ये हे समोर आले होते की, जैश-ए-मुहमद या संघटनेने आपले प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने आझाद कश्मिरला आणि बालाकोट तहशिलमध्ये हलवले आहेत, त्यातील बहुतांश गट आझाद कश्मिर आणि खैबर पख्तुनख्वा यांच्या सीमावर्ती भागात हलवले होते.विकिलिक्सच्या माहितीनूसार २००४ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका अहवालात असा उल्लेख आलेला होता की, बालाकोट हा प्रदेश "एक अशी जागा आहे जिथे आतंकवाद्यांना विस्फोटकांचे आणि तोफगोळ्यांचे प्राथमिक तसेच प्रगत प्रशिक्षण दिले जाते."[१७] भारतीय सैन्यदलाच्या गुप्तहेरांनी अशी माहिती काढली होती, बालाकोटपासून २०किमी अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरच्या घनदाट जंगलात असलेल्या आलिशान प्रशिक्षण शिबीरात ५००-७०० प्रशिक्षणार्थींना रहाता येईल अशी पोहोण्याचा तलाव, आचारी आणि स्वच्छता कर्मचारी राहातील अशी पूर्ण व्यवस्था होती.[१८] द न्यु यॉर्क टाईम्स ने अशी बातमी दिली आहे की, "अनेक पाश्चात्य संरक्षण संस्थानी अशा स्वरूपाच्या मोठ्या प्रशिक्षण शिबीराच्या अस्तित्वावर शंका उपस्थित केली आहे, जरी पाकिस्तानमध्ये अनेक आंतकवादी गट, लहान-लहान गटांमध्ये देशभर रहात असले तरीही मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबीरे चालवणे किंवा चालू देणे या कृती पाकिस्तानने कधीच थांबवले आहे." काही स्थानिक लोकांनी असली शिबीरे आधी अस्तित्वात असली तरीही तेथे आता मदरसे चालवले जात आहेत आणि फारतर त्या मदरस्यांमध्ये विद्यार्थ्यांचे येणेजाणे असते अशी ग्वाही दिली आहे.[१९]
घटनाक्रम
[संपादन]भारतीय दृष्टिकोनातून
[संपादन]२६ फेब्रुवारी २०१९ रोजी, भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहोमद या आंतकवादी संघटनेच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर बॉम्ब हल्ला केला. भारतीय परराष्ट्र सचिवांनी या हल्ल्याला "बिगर सैनिकी, आत्मरक्षणार्थ केलेला हल्ला" म्हणले आहे.[१] १९७१ च्या हल्ल्या नंतर केलेला हा पहिलाच हवाई हल्ला आहे.[२०] काही भारतीय बातम्यांच्या वाहिन्यांनी आणखी दोन ठिकाणी म्हणजेच चाकोटी आणि मुझफराबाद येथेही हल्ले झाल्याचेही कळवलेले आहे.
भारतीय बातम्यांमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, या हल्ल्यामध्ये प्रशिक्षण शिबीरातील ३५० आंतंकवाद्यांना ठार करण्यात आलेले आहे.
पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून
[संपादन]या हल्ल्याच्या परिणामकारकतेबद्दल पाकिस्तानच्या आंतर शासकीय संस्था लोकसंपर्क अधिकारी मेजर जनरल असिफ गफूर यांनी शंका उपस्थित केली आहे, त्यांनी असे नमूद केले की, २६ फेब्रुवारी २०१९ला पहाटे तीन गटांमध्ये भारतीय हवाई दलाची विमाने पाकिस्तानकडे येत होती त्यातील फक्त एकाच गटाने किरण खोऱ्यामधून मुझफराबाद जवळ येण्याचा प्रयत्न केला, ज्या प्रयत्नामध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाच्या गस्तीच्या विमानांनी त्यांना अडवले, आणि घाईने परत जाण्याच्या प्रयत्नात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आपला पे-लोड मोकळ्या जमिनीवर सोडून दिला. भारतीय विमाने पाकिस्तानच्या सीमेत आल्यापासून अवघ्या तीन मिनीटातच पाकिस्तानी गस्तीच्या विमानांनी उलट कारवाई सुरू केली होती.[२१] नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या जेट विमानांनी प्रतिहल्ल्याची तयारी लागलीच दाखवल्याने भारतीय विमानांना मागे वळावे लागले,[२२] आणि त्या घाईमध्ये भारतीय विमानांनी आपला पे-लोड सोडला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. या हवाई हल्ल्यात कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही असे पाकिस्तान सरकारने जाहिर केले आहे.[२३]
आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये
[संपादन]अटलांटिक कौंन्सिल नावाच्या डिजिटल पुरावे तपासणाऱ्या संस्थेने बालाकोटच्या हल्ल्याच्या स्थळाचे हल्ल्यापूर्वीच्या आणि नंतरच्या उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करून हल्ल्याचा परिणाम तपासला आणि त्याच्या अहवालात असे स्पष्ट झाले की, हल्ला बालाकोट जवळच्या एका टेकडीवर स्फोटाने झालेले खड्डे दिसत आहेत, प्रत्यक्षात कोणत्याही इमारतीला क्षती पोहोचल्याचे दिसत नाही.[२४]
हे ही पहा
[संपादन]नोंदी
[संपादन]- ^ India became a nuclear power with successful Smiling Buddha operation in 1974 and Pakistan's successful operation of Chagai-I took place in 1998.[७]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b c "India Strikes After Pulwama Terror Attack, Hits Biggest Jaish-e-Mohammed Camp In Balakot". NDTV.com. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "Indian jets bomb targets within Pakistan". www.news.com.au. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "Indian aircraft violate LoC, scramble back after PAF's timely response: ISPR - Pakistan - DAWN.COM". Dawn (इंग्लिश भाषेत). 26 February 2019. 26 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "India launches air strike in Pakistan; Islamabad denies militant camp hit". Reuters (इंग्रजी भाषेत). 26 February 2019. 26 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले. Text " Reuters" ignored (सहाय्य)
- ^ Naqash, Tariq (27 फेब्रु, 2019). "4 AJK civilians dead, 11 wounded in 'indiscriminate' Indian shelling across LoC". DAWN.COM.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ DelhiFebruary 26, India Today Web Desk New; February 26, 2019UPDATED:; Ist, 2019 11:50. "India airstrike in Pakistan: IAF crosses LoC first time since 1971 war". India Today.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Teh-Kuang Chang; Angelin Chang; Brent T. Gerchicoff. Routledge Handbook of Asia in World Politics. ISBN 1-317-40426-2.
- ^ India Blames Pakistan for Attack in Kashmir, Promising a Response Error in webarchive template: Check
|url=
value. Empty., [[न्यू यॉर्क टाइम्स|न्यू यॉर्क टाइम्स. Feb 15, 2019. Quote:The militant who claimed responsibility for the attack, Aadil Ahmad Dar, was from a village about six miles from where the Indian convoy was struck, in contrast to the fighters and weapons that once streamed in from Pakistani-occupied areas to sustain the insurgency. And the explosives he packed into his car appear to have been locally procured, security experts said. - ^ "Pulwama attack: India will 'completely isolate' Pakistan". 15 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Jaish terrorists attack CRPF convoy in Kashmir, kill at least 40 personnel - Times of India ►". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ DelhiFebruary 16, India Today Web Desk New; February 16, 2019UPDATED:; Ist, 2019 14:11. "Pulwama Attack 2019, everything about J&K terror attack on CRPF by terrorist Adil Ahmed Dar, Jaish-e-Mohammad". India Today.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "On Kashmir attack, Shah Mahmood Qureshi says 'violence is not the govt's policy'". DAWN.COM. 16 फेब्रु, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ http://time.com/5538756/india-pakistan-kashmir-tensions-airstrikes/ Tensions Between India and Pakistan Are at Their Highest Point in Decades. Here's What to Know
- ^ CNN, Analysis by Nikhil Kumar. "Why being seen as tough on Pakistan helps India's Modi". CNN.
- ^ a b "Pakistan warns India against attacking". 19 फेब्रु, 2019 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Pakistan will address actionable evidence if shared by Delhi, PM Khan tells India after Pulwama attack". DAWN.COM. 19 फेब्रु, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://wikileaks.org/gitmo/pdf/pk/us9pk-000301dp.pdf
- ^ "350 terrorists killed while sleeping: Sources". Deccan Herald. 26 फेब्रु, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://gulfnews.com/world/asia/pakistan/as-it-happened-tension-mounts-after-indian-fighter-jets-cross-kashmir-frontier-bomb-camps-1.1551149047465 As it happened: Tension mounts after Indian fighter jets cross Kashmir frontier, bomb camps
- ^ https://www.telegraph.co.uk/news/2019/02/26/indian-planes-bomb-pakistan-kashmir-tensions-escalate/%7Carchive-date=26 February 2019
- ^ "'Time for India to wait for our response': ISPR DG debunks New Delhi's claims on LoC violation". DAWN.COM. 26 फेब्रु, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Ghafoor, Maj Gen Asif (25 फेब्रु, 2019). "Indian aircrafts intruded from Muzafarabad sector. Facing timely and effective response from Pakistan Air Force released payload in haste while escaping which fell near Balakot. No casualties or damage".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Indian aircraft violate LoC, scramble back after PAF's timely response: ISPR". DAWN.COM. 26 फेब्रु, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ @DFRLab. "Surgical Strike in Pakistan a Botched Operation?". DFRLab. 2019-03-01 रोजी पाहिले.