२०१९ क्राइस्टचर्च दहशदवाती हल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्चमधील दहशहतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार झाल्या तर ५० अधिक जखमी झाल्या होत्या. शुक्रवारच्या नमाझच्या वेळी एकत्र झालेल्या लोकांवर ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्ती ने दोन अर्धस्वयंचलित रायफली, दोन शॉटगन आणि इतर शस्त्रांसह हल्ला केला. अल नूर मशीदीत ४२ लोकांना ठार करून तो लिनवूड इस्लामी केंद्रावर गेला व तेथे त्याने सात अधिक व्यक्तींना मारले. एक व्यक्ती दवाखान्यात मृत्यू पावली. बांगलादेश क्रिकेट संघ या सुमारास न्यू झीलँडच्या दौऱ्यावर असताना क्राइस्टचर्चमध्ये होता व अल नूर मशीदी पासून अगदी जवळ होता. या संघातील कोणालाही अपाय झाला नाही.