२०१८ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१८ तथा २०१८: एव्हरीवन इझ अ हीरो हा केरळच्या २०१८ मधील पूरस्थितीवरील २०२३ चा भारतीय मल्याळम भाषेतील सर्वायव्हल थरारपट आहे. [१] [२] याचे दिग्दर्शन जुड अँथनी जोसेफ यांनी केले आहे, ज्यांनी अखिल पी. धर्मजन सोबत पटकथा देखील लिहिली आहे‌. चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, नरेन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन आणि लाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. [३] [४] [५]

सुरुवातीला २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, तो अखेरीस ५ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि सिनेमॅटोग्राफीसाठी या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. तिकीट खिडकीवर ₹२०० कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा सर्वकालीन मल्याळम चित्रपट बनला‌. तसेच हा चित्रपट २०२३ मधील नवव्या क्रमांकाचा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला. [६] [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Joshy, Jinto. "2018". greatandhra. 2023-06-27 रोजी पाहिले.
  2. ^ "'2018' Movie buffs call the Jude Anthany Joseph film the 'real kerala story'". The Times of India. 5 May 2023. Archived from the original on 8 May 2023. 8 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Jude Anthany Joseph's 2018 first look to be out on this date". Cinema Express (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 12 December 2022. 12 December 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Jude Antony Joseph's Film On Floods That Ravaged Kerala Titled '2018'". Outlook India (इंग्रजी भाषेत). 4 November 2022. 12 December 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Jude Anthony Joseph Unveils Title of his Upcoming Film Based on 2018 Kerala Floods". News18 (इंग्रजी भाषेत). 5 November 2022. Archived from the original on 12 December 2022. 12 December 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "2018 Box Office Collection: Tovino Thomas Film Sets Mollywood Record, Crosses Rs 160 Crore Worldwide". Times Now (इंग्रजी भाषेत). 2023-05-30. 2023-07-04 रोजी पाहिले.
  7. ^ "തിയറ്ററുകളിൽ റെക്കോർഡിന്റെ പെരുമഴ തീര്‍ത്ത '2018' ഒടിടി റിലീസ് പ്രഖ്യാപിച്ചു". ManoramaOnline (मल्याळम भाषेत). Archived from the original on 29 May 2023. 2023-05-29 रोजी पाहिले.