ह.शि. खरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

ह.शि. खरात हे एक मराठी लेखक व कवी आहेत. त्यांच्या अनेक कविता अभिरुची, अस्मितादर्श, आरंभ, गावकरी, नवयुग, प्रतिष्ठान, बहुमत, भारूड, मनोहर, रविवार मराठा, माणूस, युगवाणी, सत्यकथा, संदर्भ, साधना, इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

पुस्तके[संपादन]

 • इथे ओशाळाला चिंतू (एकांकिका)
 • कावराबावरा (कवितासंग्रह)
 • गोची (बालकविता संग्रह). मसापचे सर्वश्रेष्ठ कवितेचे पारितोषिक, १९९६.
 • खसखशीचा मळा (याच नावाचे एक पुस्तक डाॅ. द.ता. भोसले यांचे आहे
 • चांदोबा चांदोबा रुसलास का? (बालकविता)
 • च्युइंगम (बालकविता संग्रह)
 • जंगल मंगल कथा (बालसंगीतिका). महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेले पुस्तक
 • झुणका भाकर (चुरचुरीत लेख)
 • निवडक पुन्हा प्रपंच (आकाशवाणी श्रुतिका)
 • पत्तेनगरीत (बालकविता संग्रह)
 • बाटली, बाई आणि मंडळी (विनोदी एकांकिका संग्रह)
 • बायको, रुमाल आणि प्रमोशन (एकांकिका संग्रह)
 • बिंग कविता (विडंबने व विनोदी कवितासंग्रह)
 • माती द्या हो माती! (लोकनाट्य)
 • मुक्तांगण (ललित लेख)
 • मुक्याचे अभंग (कविता)
 • मुंगीचं लगीन (बालकविता)
 • यक्ष-यक्षिणीचा डोंगर (दीर्घकथा)
 • सवतकडा (दीर्घकथा)
 • स्त्री कथक (कथा)
 • स्वप्नवास्तव (कवितासंग्रह)
 • हॅटखाली डोकं असतंच असं नाही (तीन-अंकी फार्स)
 • हसायदान (विनोदी कथा). याच नावाचा मधुकर टिल्लू यांचा एकपात्री नाट्यप्रयोग आहे. या एकपात्रीचे एक हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • 'गोची'ला मसापचा पुरस्कार
 • 'जंगल मंगल'ला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार