होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (इंग्रजी: Honda Motorcycle and Scooter India, Private Limited (HMSI)) ही होंडा मोटार कंपनी, जपानची संपूर्ण मालकी असलेली भारतीय उपकंपनी आहे.[१] 1999 मध्ये ही स्थापित झाली. ही कंपनी Kinetic Honda Motor Ltd (1984-1998), Hero Honda (1984-2011) आणि Honda Siel Cars India (1995-2012) नंतरची भारतातील चौथी होंडा ऑटोमोटिव्ह कंपनी होती.[२] होंडाची स्थापना 1999 मध्ये मानेसर, जिल्हा गुरगाव, हरियाणा येथे झाली.

होंडा ही मोटारसायकलची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. होंडाकडे हरियाणातील मानेसर, राजस्थानमधील टपुकारा, नरसापुरा, कर्नाटकातील कोलार आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील विठ्ठलापूर येथे चार उत्पादन केंद्रे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "honda". Archived from the original on 2007-08-04. 2022-08-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Honda Group". Archived from the original on 2007-08-13. 2022-08-26 रोजी पाहिले.